अश्वमेध

pages: 
728
price: 
600 रु.
ISBN: 
978-93-83678-38-9
Edition: 
पहिली
Cover Page: 

रवींद्र शोभणे यांची ‘अश्वमेध’ ही कादंबरी म्हणजे ‘पडघम’ या त्यांच्या आधीच्या कादंबरीचा पुढील भाग होय. इ. स. १९७५ ते २००० या कालखंडावर आधारित त्रिखंडात्मक कादंबरीचा हा दुसरा खंड.
मराठीमध्ये कालखंडाला-प्रत्यक्षातील कालखंडाला केंद्रस्थानी ठेवून कादंबरीलेखन फारसे झाले नाही. प्रत्यक्षातील कालखंड जेव्हा एखादा लेखक चित्रणासाठी निवडतो तेव्हा त्या कालखंडावर प्रभाव टाकणार्‍या प्रत्यक्षातील व्यक्ती त्याला टाळता येत नाहीत. येथे रवींद्र शोभणे यांनी प्रत्यक्षातील व्यक्तींची प्रभावी पुननिर्मिती तर केली आहेच; पण तो कालखंड उभा करण्यासाठी विविध वृत्तीप्रवृत्तींची असंख्य व्यक्तिचित्रेही निर्मिली आहेत. यातून एक कालभान प्रकट होते.
ही कादंबरी राजकीय जीवनावर भर देणारी असली तरी केवळ तेवढेच चित्रण करणे हा तिचा हेतू नाही. राजकारणाचा मुख्य पदर चित्रित होत असतानाच जीवनाच्या अनेक क्षेत्रांत कसे बदल होत जातात याचेही भान येथे प्रकट झाले आहे. त्यामुळे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रातही कसे बदल होत जातात, याचे अतिशय सूक्ष्म आकलन रवींद्र शोभणे यांनी केले आहे.
परस्परविरोधी प्रेरणांनी भरलेले जीवन समजून घेणे, जीवनासंबंधी मूलभूत जाणीव विकसित करणे आणि दुःखितांच्या बाजूने उभे राहणे या बाबी फार कमी लेखनात आढळतात. त्या ‘अश्वमेध’मध्ये आहेत, ही रवींद्र शोभणे यांची मोठी जमेची बाजू म्हणता येईल.
-डॉ. नागनाथ कोत्तापल्ले
(प्रस्तावनेतून)

Rate this post Not rated