गाज

pages: 
133
price: 
170 रु.
ISBN: 
978-93-83678-63-1
Edition: 
पहिली
Cover Page: 

मच्छिमार!
व्यवसायाधिष्ठित जातिव्यवस्थेचा काळाच्या ओघातही
टिकून राहिलेला एक तुकडा.
मच्छिमारांच्या क्षेत्रात आजही तुलनेनं इतरांचा वावर कमीच आहे.
त्यामुळेच की काय, पण मच्छिमारांचं जग अजूनही
समुद्रातल्या बेटासारखं राहिलेलं आहे.
त्यांची आपली अशी एक वेगळीच दुनिया असते.
त्यांची भाषा वेगळी, दिनक्रम, रीतीरिवाज-श्रद्धा, खाणं-पिणं,
भरती-ओहोटीवर हेलकावणारे हर्षखेद हे सगळंच वेगळं!

मुंबईसारख्या महानगरीत राहूनही ते स्वतःला
इतरांपेक्षा वेगळे ठेवू शकतात.
मग कोकणकिनाऱ्यावरच्या मच्छिमारांचं तर काय असेल?

त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्वतःचं वेगळेपण जपताना
ते श्रेष्ठत्वाचा आवही आणत नाहीत किंवा आपण उपेक्षित असल्याचा
टाहोही फोडत नाहीत. मात्र स्वतःचं वेगळेपण जपणाऱ्या या मच्छिमारांचं
चित्रण मराठी साहित्यात फार कमी दिसतं. या कादंबरीत लेखिकेनं
त्यांच्या जगण्याचे बारकावे खोलवर जाऊन टिपले आहेत.

समुद्रकिनाऱ्याच्या सोबतीनं जगणाऱ्या मच्छिमारांच्या आयुष्यातलं
निसर्गाचं स्थान एखाद्या कुटुंबीयाइतकंच अपरिहार्य असतं.
‘गाज’मध्ये एकीकडे मच्छिमारांच्या दुनियेचं वेगळेपण आणि
दुसरीकडे त्यांचं माणूस म्हणून जाणवणारं सामान्यपण या दोन्हीचा
तोल सांभाळताना पार्श्वभूमीला निसर्गाचं अस्तित्व सतत जाणवत राहतं.
म्हणूनच ही कादंबरी केवळ ‘लेखन’ न राहता
मच्छिमारांच्या जगण्याचा ‘क्लोजअप’ वाटतो.
-प्रमोदिनी वडके-कवळे

Rate this post Not rated
( categories: )