सुहदगान

pages: 
296
price: 
300 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वेगवेगळ्या निमित्ताने अनेक माणसे येत असतात. त्यांपैकी काही जणांशी आत्मीय असे नाते उत्पन्न होते. प्रदीर्घ सहवासामुळे या नात्याला एक प्रकारची उत्कटता लाभते. आपले जीवन समृद्ध झाल्याचा प्रत्यय येतो. विलास खोले यांच्या बाबतीतही असेच घडले आहे. त्यांच्याशी आत्मप्रत्यय शब्दांकित करण्यातून ‘सुहदगान’मधील व्यक्तिलेख आकाराला आले आहेत. पु. ग. सहस्रबुद्धे, वि. रा. करन्दीकर, के. ज. पुरोहित, म. द. हातकणंगलेकर, मधु मंगेश कर्णिक, माधव मोहोळकर, वि. बा. प्रभुदेसाई, रा. ग. जाधव, सु. रा. चुनेकर, राजेन्द्र बनहट्टी, वि. शं. चौघुले, सुभाष भेण्डे, ग्रेस, नागनाथ कोत्तापल्ले, अशोक कोठावळे इत्यादी साहित्यविश्वातील कर्तृत्वान व्यक्तिंविषयीचे हे व्यक्तिचित्रात्म लेखन उत्कट व गुणग्राहक झाले आहे. या लेखातून वर्णित व्यक्तींच्या विविध गुणांचा जसा परिचय होतो तसाच माणूस समजून घेण्याच्या विलास खोले यांच्या आस्थापूर्ण आकलनाचाही परिचय घडतो. दोघांमधील नात्याची हृद्यता व स्नेहाची स्निग्धता आपोआप अनुभवास येते. या व्यक्तिचित्रांच्या माध्यमातून जवळपास गेल्या चार दशकांतील साहित्यप्रांताची सुखद सफर घडते. रेखाटनविषय झालेल्या व्यक्तींचे लेखकाने घडविलेले दर्शन कोणाही वाचकाला आल्हाददायक वाटावे असे आहे.

Rate this post Not rated
( categories: )