क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले

pages: 
119
price: 
100 रु.
Edition: 
चौथी
Cover Page: 

भारतातील पहिली भारतीय शिक्षिका, मुख्याध्यापिका,
स्त्री-शूद्र व अनाथकांची माता आणि स्त्री-मुक्ती
आंदोलनाच्या प्रणेत्या म्हणून सावित्रीबाई फुले यांचे
जीवन अमर झाले आहे. महात्मा फुले यांनी आपल्या
दिव्य ज्योतीने प्रज्वलित केलेली ही एक दिव्य ज्योत
आहे. जोतीरावांप्रमाणेच सत्य, समता आणि मानवता
यांसाठी त्यांनी सर्व हयाभर प्रखर विरोधाला व
छळाला टक्कर देऊन यशस्वी लढा दिला. स्त्री ही एक
मानव आहे आणि पुरुषाइतकीच कर्तबगारी ती करू
शकते, हे सावित्रीबाईंनी स्वतःच्या कृतीने सिद्ध करून
दाखविले. आणि म्हणूनच स्त्री-पुरुष समानता
प्रतिपादणार्‍या आद्य महिला; आणि स्त्रीची प्रतिष्ठा
प्रतिपादन करणारी पहिली भारतीय स्त्री सावित्रीबाईच
ठरते.
-लेखकाच्या प्रस्तावनेतून

Rate this post Not rated
( categories: )