चार्ल्स डिकन्स

pages: 
326
price: 
300
Edition: 
पहिली
Cover Page: 

`पिकविक पेपर्स’, `ऑलिव्हर ट्विस्ट’, `डेव्हिड कॉपरफील्ड’, `ए टेल ऑफ टू
सिटीज’ या कादंबर्‍यांनी पाश्र्चात्त्य साहित्यविश्र्वात अजरामर झालेल्या चार्ल्स
डिकन्सने कादंबरीकार म्हणून मानाचे स्थान मिळवले. साहित्याच्या क्षेत्रात त्याने
सातत्याने केलेले विविध प्रयोग व त्याच्या विविधांगी कार्यातून प्रकटणारे
सामाजिक भान यांमुळे त्याला न भूतो न भविष्याति अशी प्रसिद्धी मिळाली.
1812 साली इंग्लंडमधेय जन्माला आलेल्या डिकन्सने तत्कालिन सामाजिक
परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपले महत्त्वपूर्ण लेखन केले. घरच्या आत्यंतिक
गरिबीमुळे  लहानपणीच हलकीसलकी कामे करण्याची वेळ त्याच्यावर आली.
त्या परिस्थितीवर सष्टपूर्वक मात करत त्याने आपले कर्तृत्व सिद्ध केले.
पत्रकारितेपासून सुरुवात करत कादंबरी, कथा, कविता, नाटक अशा बहुविध
साहित्यप्रकारात त्याने आपला कायमचा ठसा उमटवला. त्यावेळच्या इंग्लंडमधील
बालकामगारांचे शोषण, गुन्हेगारी, दारिद्र्य, निरक्षरता, स्त्रियांची दुःस्थिती व
राज्यकर्त्यांची अनास्था यांकडे त्याने आपल्या लिखाणातून सार्‍या जगाचे लक्ष
वेधले. डिकन्सच्या या जीवनयात्रेची, त्याच्या माहित्यसेवेची, त्याच्या
प्रेमजीवनाची, समग्र कहाणी प्रदीप कुलकर्णी ह्यांनी अतिशय प्रासादिक शैलीत
शब्दबद्ध केली आहे.
-विलास खोले

Rate this post Not rated
( categories: )