पन्नास निबंध

pages: 
106
price: 
100 रुपये
Edition: 
नववी
Cover Page: 

`पन्नास निबंधां’ची वैशिष्ट्ये
विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरतील अशी मराठी निबंधाची पुस्तके आज उपलब्ध नाहीत. म्हणूनच एस्. एस्. सी. बोर्डाच्या प्रश्र्नपत्रिकेत ज्या विषयांवर निबंध लिहिण्यास विद्यार्थ्यांना सांगण्यात येतात, त्यांपैकी प्रमुख विषयांवर हे निबंध लिहिलेले आहेत. महाराष्ट्रातील विविध जिल्हा-मुख्याध्यापक, शिक्षक संघ व निवडक नामवंत शाळा यांच्या पूर्वपरीक्षांतील निवडक विषयांवरही लिहिलेले निबंध या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेले आहेत.
स्वतंत्र, प्रसन्न, चुरचुरीत, मिस्कील व सुबोध भाषाशैलीतील या निबंधसंग्रहात आत्मवृत्तपर, व्यक्तिचित्रात्मक, वर्णनात्मक, कथनात्मक, चिंतनात्मक व चर्चात्मक विषयांवरील निबंध व लघुनिबंधही आहेत.
एस्.एस्.सी. बोर्डास किंवा परीक्षकांस अपेक्षित असलेल्या मुद्यांचे टिपण बहुतेक निबंधांबरोबरच हेतुपूर्वक दिलेले आहे.
थोडक्यात काळात सातव्या आवृत्तीद्वारे `पन्नास निबंध’ पुन्हा प्रसिद्ध होत आहे, ही घटना या पुस्तकाची उपयुक्तता सांगते.

Average (1 vote):
see individual ratings
You have already rated this post. Selecting a new rating will replace your old rating.
Rate this post Not rated