व्हेन बॅड थिंग्ज हॅपन टू गुड पीपल

pages: 
144
price: 
150 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

प्रत्येक जण स्वत:ला Good Man किंवा Womanच समजत असतो. म्हणजेच मी चांगला आहे, माझं वाईट होता कामा नये, असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. तरीही वाईट जेव्हा घडतं तेव्हा साहजिकच ते का घडलं? आपल्याला ते टाळता आलं असतं का? दोष कुणाचा? असे प्रश्न मनात उपस्थित होतात.
...या आणि अशा सर्व प्रश्नांचा लेखकाने वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून या पुस्तकातून ऊहापोह केला आहे. उदाहरणे दिलेली आहेत. हे पुस्तक वाचता वाचता नकळत आपल्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत जातात. आपण कसं वागलो नि कसं वागायला पाहिजे हे उमगत जातं.
जगभरातल्या माणसांना सारखेच मार्गदर्शक ठरू शकतील असे काही विचार या पुस्तकात मांडलेले आहेत. साध्या-सोप्या भाषेत. देवावर आणि जगाच्या चांगुलपणावर विश्वास असणार्‍या माणसाने लिहिलेलं हे पुस्तक आहे. त्या माणसाने आयुष्याचा बहुतेक काळ इतरांना मदत करण्यात घालवला. पण स्वत:च्या वाट्याला आलेल्या विपरीत, दु:खद घटनेमुळे परमेश्वर, त्याची कृपा; अशा सगळ्याच गोष्टींचा पुन्हा पहिल्यापासून विचार करणं त्याला भाग पडलं आणि मग स्वत:सारख्याच, अनुभवाने पोळलेल्या, घायाळ झालेल्या व्यक्तींसाठी त्याने हे पुस्तक लिहिलं...

Average (1 vote):
see individual ratings
You have already rated this post. Selecting a new rating will replace your old rating.
Rate this post Not rated
( categories: )