तीन भिंती

pages: 
168
price: 
60 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

जन्मानेच ज्यांच्यावर दारिद्य्र लादले अशा जातीत जन्माला येऊन, ही दारिद्य्राची कोंडी फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या पिढीचे प्रतिनिधित्व प्रस्तुत कादंबरीचा नायक विश्वनाथ रांकोळे करतो.


प्राध्यापक होण्याचे स्वप्न पुरे झाल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने जेव्हा शिक्षणक्षेत्राशी संबंध येतो त्या क्षेत्रातील बजबजपुरीचे, वर्णवर्चस्वाचे दर्शन प्रस्तुत नायकाला घडते आणि त्यातून ही कादंबरी आकारत जाते. शिक्षणामुळे स्वत: नायकाच्या आणि त्यातून ही कादंबरी आकारत जाते. शिक्षणामुळे स्वत: नायकाच्या आणि ‘साहेब’ झालेल्या मुलाविषयीच्या त्याच्या आईवडिलांच्या वाढलेल्या अपेक्षा यांची येथे केवळ राख होताना दिसते. शिक्षण घेऊनही दोन वेळच्या अन्नासाठी मोताद व्हावयाची पाळी नायकावर येते,  तेव्हा तो या अन्यायाविरुद्ध उपोषणाचे अस्त्र वापरतो आणि न्याय मिळवतो.


सुशिक्षित झाल्यानंतरही जात विसरू न देणार्‍या, विसरू न शकणार्‍या प्रचलित समाजव्यवस्थेचे दर्शन येथे घडते. जातीचा पगडा जनमानसावर अजूनही किती मोठ्या प्रमाणावर आहे, या कठोर सत्याला पुन्हा एकदा या कादंबरीच्या रूपाने सामोरे जावे लागते.

Rate this post Not rated
( categories: )