थर्ड चॅनेल

pages: 
118
price: 
40 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

‘थर्ड चॅनेल’ ही अनेक अर्थांनी वेगळी कादंबरी आहे. खळबळजनक असूनही पुरेशी गंभीर असणारी, चौकटींचा धिक्कार करता करता एका विशिष्ट हेतूच्या चौकटीत काळजीपूर्वक बांधलेली आणि वाचनीयतेच्या सुबोध अंगाने जात जात वाचकांच्या चित्तवृत्ती खडबडून जाग्या करणारी. सावत्र आईशी जगावेगळे नाते जडलेला मनस्वी मनमोहन काय किंवा वासनांचा धीट स्वीकार करणारी बुद्धिमान माया काय, यांची सनसनाटी खाजगी आयुष्ये रेखाटणे एवढेच या कादंबरीचे साध्य नाही. ती पाहता पाहता कहाणीतून मुक्त होते आणि नवसमाजाच्या परिवर्तनाचे अनोखे स्वप्न साकार करते. थोर संस्कृतीच्या नावाखाली विवाह, मालकी हक्क, एकनिष्ठा, पातिव्रत्य, योनिशुचिता इ. अनैसर्गिक कल्पना उराशी कवटाळून आतून खचत आणि पिचत चाललेल्या समाजाला प्रबोधनाच्या नवसंन्यासाची वाट दाखवणारी एक विलक्षण विचारप्रणाली- ‘थर्ड चॅनेल’.

Rate this post Not rated
( categories: )