आलेख

pages: 
174
price: 
50 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

ही कथा आहे आत्माराम वाडकर नावाच्या ध्येयवेड्या शिक्षकाची. तो मानवतावादी आहे; पण व्यवहारवादाचंही त्याचं भान भक्‌कम आहे. आत्मारामाच्या शिक्षक असलेल्या वडिलांनी बेचाळिसच्या बंडाने प्रेरित होऊन आपल्या आरे गावात सामाजिक समता स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. परिणामी वाडकर कुटुंबाची त्या मातीतली मुळेच उखडली जाऊन त्यांना मुंबईचा आसरा घ्यावा लागला होता.


पुढे देश स्वतंत्र झाला. कोवळा आत्माराम आपली मुळं शोधत, मुंबईतली आपली नोकरी सोडून, पुन्हा आर्‍याला - आपल्या जन्मगावी आला. त्याला या गावचं काही ऋण फेडायचं होतं; गावचा नवा इतिहास घडवायचा होता.


आत्माराम तिथल्या सावकार घराण्याच्या एकाधिकारशाहीविरुद्ध, गावकऱ्यांच्या गतानुगतिक, कोत्या, बुरसट विचारसरणीविरुद्ध उभा ठाकला. आपल्या वैयक्तिक सुखाचं, संसाराचं, उमेदीच्या वर्षांचं दान देऊन गावासाठी शै‌क्षणिक-सामाजिक-आर्थिक विकासाच्या वाटा त्याने मोकळ्या केल्या.


पण अखेर या मातीत पाळंमुळं गाडून असलेल्या प्रतिगामी, संधिसाधू प्रवृत्तींचीच सरशी झाली. आरे गावाचा इतिहास घडवायला आलेले मास्त अखेर गावाच्या लेखी इतिहासजमा झाले. आपल्या वडिलांप्रमाणेच त्यांना गाव सोडून जाण्याची पाळी आली. आणि अशा रीतीने इतिहासाचं वर्तुळ पूर्ण झालं !


आजवरच्या मराठी साहित्यविश्वातील शिक्षकाच्या चित्रणाहून आगळावेगळा असलेला हा वाडकर मास्तरांच्या जीवनसंघर्षाचा आलेख ल. ना. केरकरांनी अतिशय प्रत्ययकारी, ताकदवान अशा शैलीत जिवंत, सळसळता रेखाटला आहे.

Rate this post Not rated
( categories: )