वाचता वाचता

pages: 
345
price: 
125 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

`वाचता वाचता’ हे `महाराष्ट्र टाइम्स’मधील एक लोकप्रिय सदर.
त्यातील लेखांचा पहिला खंड प्रसिद्ध झाल्यानंतर लिहिलेल्या लेखांचा हा दुसरा खंड.
`वाचता वाचता’ हे सदर `वाचस्पती’ या नावाने प्रसिद्ध होत होते, ते वृत्तपत्रीय सोयीसाठी. पहिला खंड त्याच नावाने प्रसिद्ध झाला. पण हे सदर `महाराष्ट्र टाइम्स’चे व्यासंगी संपादक श्री. गोविंद तळवलकर लिहितात, हे स्पष्ट झाले असून, या नव्या खंडावर त्यांचेच नाव दिले आहे.
श्री. तळवलकर यांच्या आवडीचे विषय विविध असल्यामुळे, पुस्तकांची निवडही विविध प्रकारची आहे. यात पुस्तकांची समीक्षा अभिप्रेत नसून श्री. तळवलकरांना आवडलेल्या पुस्तकांची ओळख करून देण्याचा हेतू आहे. त्यांनी चोखंदळपणे निवड केली आणि आपल्या वाचकांना या पुस्तकांचा आस्वाद मिळवून दिला. यामुळे अनेक नामवंत व्यक्तींची ओळख होते आणि अनेक देशांतील सामाजिक परिस्थितीची माहिती होते.
लेखक आपल्या विषयांत रस घेत असल्यामुळे व वाचकांना हा रसास्वाद मिळवून देण्याची ओढ असल्यामुळे प्रत्येक प्रकरणातील उत्सुकता कायम टिकते आणि वेगळ्या जगात फेरफटका केल्याचा आनंद मिळतो.
पुस्तक हे एक निमित्त होऊन, प्रत्येक प्रकरणातून एक ललित लेख तयार होतो. यामुळे `वाचता वाचता’ या सदरातील लेख स्वतःचे वेगळे स्थान मिळवून राहिले आहेत.

Rate this post Not rated
( categories: )