गाजलेले सेनानी

pages: 
168
price: 
75 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

चेंगीझखान, बाबर, अहमदशहा अब्दाली आणि नेपोलियन हे जगाच्या इतिहासातील गाजलेले सेनानी. यांतील चेंगीझखानने अक्षरशः शून्यातून साम्राज्य उभे केले, तर बाबराने परिस्थितीचे अवलोकन करून भारतासारख्या दूरदेशी येऊन साम्राज्य स्थापन केले. अब्दालीने अफगाणिस्तानची निर्मिती करताना भारतासारख्या समृद्ध देशावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आक्रमण करून यश तर मिळवलेच, पण आपल्या राष्ट्राला लाभही मिळवून दिला; तर मरगळलेल्या फ्रान्सच्या सैन्यात वीरश्रीची आणि प्रचंड उत्साहाची लाट निर्माण करून नेपोलियनने संपूर्ण युरोप पादाक्रांत करून आपल्या कुशल युद्धनेतृत्वाची चमक दाखवून जगाला थक्क केले.
या चारही सेनापतींमध्ये असलेले साम्य म्हणजे या चौघांनीही लहानपणीच आपले पितृछत्र गमावले होते आणि त्यानंतर मुख्यतः स्वकर्तृत्वावर त्यांनी आपले व्यक्तिमत्त्व घडविले.
या चारही सेनानींच्या युद्धतंत्रातील महत्त्वपूर्ण बाबींचा अभ्यास करून कॅ. राजा लिमये यांनी त्या वाचकांसमोर सादर केल्या आहेत. ही चरित्रे अभ्यासकांना उपयुक्त ठरतील आणि मराठी वाचकांना निश्र्चितच भावतील ही खात्री आहे.

Average (1 vote):
see individual ratings
You have already rated this post. Selecting a new rating will replace your old rating.
Rate this post Not rated
( categories: )