भारतीय सेनादलाची यशोगाथा

pages: 
164
price: 
120 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

भारतीय सैन्यदलाचा इतिहास तीनशे वर्षे पुरातन आहे. केवळ सामानवाहू श्रमिक दलापासून (पायोनिअर्स) ते दुसर्‍या  महायुद्धात दास्त राष्ट्रांच्या खांद्याला खांदा लावून लढलेल्या सक्षम दर्जेदार सैन्यदलापर्यंतची भारतीय सैन्याची वाटचाल ही मनोवेधक आहे.
`भारतीय सेनादलाची यशोगाथा’ या पुस्तकातून कॅ. राजा लिमये यांनी भारतीय सैन्याच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या यशाचा धावता आढावा घेऊन नंतर स्वातंत्र्योत्तर यशोमालिकेतील जवळ-जवळ प्रत्येक लखलखीत आणि उज्ज्वल तेजोगोलाचा परामर्श घेतलेला आहे. या सार्‍याच यशोगाथांमध्ये एकच स्थायीभाव दृग्गोचर होतो- अनंत ध्येयासक्ती आणि दुर्दम्य आशावादाचा. प्रत्येक यशोगाथा वाचताना भास होतो की, तेचतेच महात्मे तर पुनःपुन्हा अवतरले नसावेत ना? सगळ्यांच्यात कोणता तरी एक समान धागा असल्याची जाणीव होते.

-शशिकांत पित्रे यांच्या प्रस्तावनेतून
Rate this post Not rated
( categories: )