कर्झनकाळ

pages: 
196
price: 
250 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

भारतातील सात वर्षांच्या काळात लॉर्ड कर्झनने केलेल्या कार्यात इतकी विविधता आहे की, त्याच्या अफाट श्रमांचे यथायोग्य चित्रण करणे सोपे नाही. तो १२ सुधारणांचा कार्यक्रम घेऊन आला. तो लवकरच २० सुधारणांइतका विस्तारला. कर्झनने आपल्या व्हाइसरॉयपदाच्या सात वर्षांच्या काळात परराष्ट्र धोरण, तसेच भारतीय जनतेच्या, खासकरून शेतकर्‍याच्या स्थितीमध्ये सुधारणा करणे या संदर्भात जे लक्षणीय काम केले त्याचा जयराज साळगावकर यांनी या पुस्तकात साक्षेपी आढावा घेतला आहे. त्याने पश्चिमेकडचे तंत्रज्ञान आणि प्रगती प्रथमच भारतात आणली आणि भारताला आधुनिकतेच्या उंबरठ्यावर आणून सोडले. पण तसे करताना भारतीय शेतीला मात्र आधुनिकीकरणाची किंमत भरायला लावली नाही. दोघांनीही एकाच वेळी सुधारावे आणि आधुनिक व्हावे अशी त्यांची इच्छा होती. लॉर्ड कर्झनच्या व्हाइसरॉयपदाच्या कारकीर्दीतील विधायक भागांवर प्रकाशझोत टाकून जयराज साळगावकर यांनी मराठी वाचकवर्गाची मोठी सेवा केली आहे.
अरविंद गणाचारी
(प्रस्तावनेतून)

Rate this post Not rated
( categories: )