Keyboard HelpSearchNavigationUser login |
हुतात्माby मीना देशपांडे.
pages: 594 price: 450 रु. Edition: पहिली Cover Page: ![]() संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी घडलेल्या या प्रचंड महाभारतात सामान्य माणसांनी घरादाराची अन् प्राणांची पर्वा न करता, आपले ईप्सित साध्य करण्यासाठी सत्ताधार्यांशी अभूतपूर्व असा लढा दिला. या चळवळीला अनेक मोठमोठ्या नेत्यांचं सारथ्य लाभलं तरी ही चळवळ खर्या अर्थाने जनतेचीच होती. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीत जनतेने केलेल्या बलिदानाबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना आचार्य अत्रे यांनी कृतज्ञतापूर्वक म्हटलंय, ``संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश लोकांनी आणला. जनतेनं सगळ्या नेत्यांना आपल्याबरोबर फरपटत नेलं. संयुक्त महाराष्ट्राचा हा जगन्नाथाचा रथ खरा लोकांनी ओढला. त्याला आम्हीही हात लावला. म्हणून काही श्रेय देणार असाल तर आमचाही त्या वाटा आहे एवढंच.’’ ( categories: )
|
EnglishMarathi
Use Ctrl+\ to toggle Also read about...Invite a friend |