उदय वैश्र्विक प्रज्ञेचा

pages: 
397
price: 
350 रु.
Edition: 
पहिली
Cover Page: 

दादाजी गावंड यांचे हे आत्मचरित्र आपणास अंतिम आंतरिक क्रांतीच्या दिशेने प्रवृत्त करते आणि अंतरंगातील अमर ज्योतीचे दर्शन घडवून आणण्यास साहाय्यक ठरते. शोधाअंती दादाजींना एक विलक्षण आंतरिक विस्फोटाची अनुभूति झाली. ज्यायोगे त्यांच्या संपूर्ण विचार मनाची संरचनाच कोलमडून पडली.
तद्नंतर एक सर्वस्वी नूतन आणि गूढ ऊर्जा स्फुरण पावली आणि तिने झळाळत्या बिजलीच्या तेजाने दादाजींचे रोमरोम प्रफुल्लित केले आणि त्यांच्या अंतरंगात संपूर्ण परिवर्तन घडवून आणले. ही अनन्य ऊर्जा एका उच्च आयामातून स्फुरली होती आणि ती विचार-मनाच्या कक्षे पलीकडील स्तरावर कार्यरत होती.
उत्स्फूर्त व ज्वलंत जाणिवेच्या या गूढ गरूडझेपेचे सविस्तर वर्णन दादाजी या ग्रंथात करतात. आंतरिक शोधाच्या प्रवासाची ही अद्भुत कहाणी वाचकास अगदी खिळवून टाकते. मग तो वाचक कोणत्याही प्रकारचा असो- एखादा साधक, सामाजिक कार्यकर्ता, मनोवैज्ञानिक, शास्त्रज्ञ अथवा इतर कोणीही.
मानवाचे आपलेच मन, त्याचा `मी’ हेच त्याच्या पुढील अंतिम आव्हान आहे! या आव्हानातच मानवास स्वतःची पूर्ण क्षमता ओळखण्याची एक संधी आहे. स्वतःला, या `मी’ ला गमावण्यातच मानवाला जीवनाची सर्वोच्च भेट प्राप्त होईल,
ती भेट म्हणजे जीवन मुक्ती होय.
मुक्तीचा हा आपला ठेवा तुमच्या भेटीस आतुर आहे!

Rate this post Not rated