अल्बर्ट आइन्स्टाईन

pages: 
270
price: 
280 रु.
Edition: 
दुसरी
Cover Page: 

नोबेल पारितोषिकविजेता डॉ. अल्बर्ट आइन्स्टाईन हा जर्मनीतील एका सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेला मुलगा…!
लहान वयातच कल्पनेद्वारे सूर्याच्या किरणशलाकेवर आरूढ होऊन, गरुडभरारीने आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेला… ऐन तारुण्यात झ्युरिकच्या पेटंट ऑफिसमध्ये तृतीय श्रेणीचा कारकून म्हणून काम करीत असताना विशिष्ट सापेक्षता सिद्धान्तासह अत्यंत प्रभावी व उच्चतम दर्जाचे पाच प्रबंध लिहिणारा…
पहिल्या महायुद्धात, शारीरिक व मानसिक दृष्टिने होरपळून निघत असताना, कौटुंबिक व आर्थिक समस्यांना तोंड देत, जगाला हादरवून सोडणारा व्यापक सापेक्षता सिद्धान्त मांडणारा व E=mc2 या जगद्विख्यात सूत्राचा जनक…
अल्बर्ट हा केवळ सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ नव्हता; तर एक उत्तम व्हायोलिनवादक व तत्त्वज्ञ होता.
जर्मनीत हिटलरची हुकूमशाही सुरू होताच नाझी लोक त्याच्या जीवावर टपले व त्याला आपल्या जन्मभूमीचा त्याग करावा लागला. भौतिक विज्ञान क्षेत्रात कमावलेल्या अत्युच्च स्थानाचा उपयोग त्याने असंख्य ज्यू निर्वासितांच्या पुनरुत्थानासाठी केला.
दुसर्‍या महायुद्धात लाखो ज्यूंची झालेली ससेहोलपट, अणुबॉम्बची कल्पना, निर्मिती व प्रचीती याचे समग्र व यथार्थ दर्शन घडवणारे हे पुस्तक.

Rate this post Not rated