ऑपरेशन ब्लॅक टॉरनॅडोः एक जीवघेणा प्रवास

pages: 
90
price: 
135 रुपये
Edition: 
पहिली
Cover Page: 

26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या संबंधी लिहिलेले जीतेंद्र दीक्षित यांचे हे पुस्तक म्हणजे केवळ एखाद्या पत्रकाराची डायरी नाही. यात सामान्य माणसाच्या वेदना, त्यांचे रागलोभ याचेही यथार्थ दर्शन होते. अशा प्रकारचे रिपोर्टिंग करताना संभाव्या धोके काय काय असू शकतात याचेही व्यवस्थित चित्र उमटले आहे. तसेच यात एक रिपोर्टर म्हणून कोणत्या जबाबदार्‍या घ्याव्यात याचेही भान दिसते. एक पती आणि पुत्र म्हणून जी कर्तव्ये करावी लागतात तेच कर्तव्यामुळे आलेली अगतिकता यात प्रामणिकपणे लिहिली गेलीय. हे पुस्तक सर्व प्रकारे वेगळे याचसाठी आहे की, यात 60 तासांच्या जीवघेण्या दहशती वातावरणाचा प्रत्यक्ष घेतलेल्या अनुभवांचे चित्रण आहे आणि हे वर्णन कुठल्याही चार्जशीट अथवा इतर दस्तावेजात दिसणार नाही. हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले वर्णनच आपल्या समोर 26/11 च्या हल्ल्याचे चित्र मनात उमटवते.
सुनील मेहरोत्रा (नवभारत टाइम्स)


लग्न झाल्याला केवळ काही महिने उलटल्यानंतर जीतेंद्र दीक्षित यांनी जीवावरचा धोका पत्करून जे रिपोर्टिंग केले ते वाचून अंगावर काटा येतो. ताज हॉटेलच्या जनरल मॅनेजरांची पत्नी आणि मुलांचा जीव वाचवता न आल्याच्या अपराधी भावनेने भावविव्हळ झालेल्या फायर ब्रिगेडच्या कर्मचार्‍यांचा प्रसंग वाचताना अक्षरशः डोळे पाण्याने भरून आले. हे छोटेखानी पुस्तक अंतर्बाह्य हादरवून टाकते.
प्रभाकर पवार (दै. सामना)

26/11 च्या हल्ल्याशी संबंधित खूप काही माहिती या पुस्तकात आहे, जी सामान्य लोकांना माहित नाही. या पुस्तकामुळे आपल्या लक्षात येते की, रिपोर्टर लोक किती घातक ठिकाणी कुठल्याही सुरक्षेच्या साधनांअभावी या हल्ल्याचे चित्रीकरण आपल्या कॅमेर्‍यात कैद करीत होते. जीवनाच्या त्या थरारक क्षणांचा सामना यांनी ज्या प्रकारे केला तो थरारक आहे. शिवाय हे पुस्तक पत्रकारांच्या व्यावसायिक जबाबदार्‍या आणि कौटुंबिक गरजा यात जी घालमेल होते त्यावरही भाष्य करते. ह्या पुस्तकातील घटना इतक्या वेगवान वर्णनांनी भरलेल्या आहेत की, वाचकांना ते खिळवून ठेवेल यात शंका नाही.
वाय. पी. सिंह (पूर्व आय. पी. एस. अधिकारी)

हे पुस्तका म्हणजे कथासंग्रह किंवा कादंबरी नाही. तरीही इतके उत्कंठावर्धक आहे की, आपण ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत एका बैठकीत वाचून संपवतो. 26/11 च्या अतिरेक्यांच्या हल्ल्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. तथापि जीतेंद्र यांचे हे पुस्तक आपल्याला मीडियातील एका हिंमतबाज पत्रकाराने स्वतः पाहिलेल्या आणि मन व बुद्धीने केलेल्या वर्णनाचा परिचय घडवते. जीतेंद्र दीक्षित यांचे पुष्कळसे रिपोर्ट मी पाहिले आहेत. त्यांचे रिपोर्ट नेहमीच वास्तवाला भिडणारे, स्पष्टीकरण देणारे आणि संयत असतात. त्यांचे ह पुस्तकही अगदी समतोलपणे लिहिलेले असून सत्याचा अधिक समक्षपणे वेध घेण्यात यशस्वी झाले आहे.
स्वाती साठे (अधीक्षक, नासिक रोड मध्यवर्ती कारागृह)


सुरुवात केल्यावर पुस्तक केव्हा संपते तेच कळले नाही. पोलिसांकडे स्वसंरक्षणासाठी शस्त्रे तरी असतात. परंतु टिव्ही रिपोर्टरांकडे केवळ कॅमेरा आणि माईक असतो, ज्याचा त्यांना स्वतःचा बचाव करण्याच्या दृष्टीने काहीही उपयोग नसतो. अशा परिस्थितीत जीतेंद्र दीक्षित यांनी ज्या हिमतीने या हल्ल्याचे वार्तांकन केले ते खरोखरीच त्यांच्याबद्दलचा आदर वाढवणारे आहे. जीतेंद्र यांनी या अमानुष हल्ल्याचे वर्णन करता करता समाजमनातील सुष्ट आणि दुष्ट शक्तींचाही अतिशय तरलतेने वेध घेतला आहे, हे जाणवत राहते.
संजय गोविलकर (सहाय्यक पोलीस निरीक्षक)

Rate this post Not rated