दुर्दैवी प्रतिभावंत श्रीनिवास रामानुजन

pages: 
140
price: 
125 रु.
Edition: 
दुसरी
Cover Page: 

‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या ग्रंथात रामानुजनसंबंधी जवाहरलाल नेहरूंनी लिहिले आहे की, ‘‘रामानुजनचं अल्पायुष्य आणि त्याचा अकाली झालेला मृत्यू हे त्या वेळच्या भारताच्या परिस्थितीचं निदर्शक आहे. कोट्यवधी लोकसंख्या असलेल्या या भारतात अगदी थोड्या लोकांना शिक्षणाची संधी मिळते, आणि बहुतांशी लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर जगत असतात. या सर्वांना अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण मिळलं आणि विकासाच्या समान संधी उपलब्ध झाल्या तर समाजात सुप्तावस्तेत असलेले कितीतरी शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि कलावंत समाजापुढे येतील आणि‌ हिंदुस्थानचे व जगाचे चित्र पालटू शकतील.’’
रामानुजनाविषयी जवाहरलाल नेहरूंनी व्यक्त केलेल्या अभिप्रायाचा यथार्थ प्रत्यय प्रदीप कुलकर्णी यांनी लिहिलेल्या रामानुजनच्या चरित्रातून येत राहतो. रामानुजनची अलौकिक प्रतिभा, दीर्घकाळ होत राहिलेली त्याची उपेक्षा, त्याचे कष्टपूर्ण जीवन, इंग्लंडात गेल्यावर उजळलेला त्याचा प्रज्ञेचा प्रकाश, क्षयरोगातून निपजलेले त्याचे असाध्य आजारपण आणि अकाली संपुष्टात आलेली त्याची जीवनयात्रा याचा मनोज्ञ आलेख दुर्दैवी प्रतिभावंत या पुस्तकात समर्थपणे रेखाटला आहे. अतिशय प्रसन्न व प्रासादिक शैलीत लिहिलेले थोर भारतीय गणितज्ज्ञाचे हे चरित्र वाचकांना एका असाधारण व अद्‌भुत ज्ञानवंताचा परिचय करुन देईल.

Average (1 vote):
see individual ratings
You have already rated this post. Selecting a new rating will replace your old rating.
Rate this post Not rated

book on Ramanujan by Pradeep Kulkarni

I have read and studied book on Ramanujan by P. Kulkarni. I think nobody can write better book on Ramanujan than this book !!! I tried to convey my thanks to the author for writing such an informative book ; but his e mail address written in the book is no more valid or working. Anybody knowing his present e mail address please convey to me on


medhekar_nitin@yahoo.com


I thank Majestic Prakashan for publishing such a unique book.